अनामिका

अनामिका
New लेखिका on the block

Wednesday, 20 April 2016

कळतं.. नकळत..

ती:काय झाला?तू असा तुटकतुटक का वागत आहेस?काही बोलणार आहेस का?
तो:nothing..काही नाही,तुला काय झाला.अचानक माझ्या न बोलण्याची दखल घेत आहेस.
ती:हेच ,हेच मला कळत नाहीये.तू असा का वागत आहेस.
तो:जाऊ देत.काही नाही. तुला उगाच असा वाटतंय.
ती:रजत ,तुला काही सांगायचं आहे का मला?सगळे म्हणतआहेत कि....
तो:काय??(????)
ती:कि तुला मी....
तो: हे बघ ,उगाच अर्धवट बोलू नकोस.(नजर वळवून)
ती:Thats what..आपली मैत्री घट्ट आहे.सगळे काहीतरी दुसरा अर्थ काढत आहेत.आणि एक ऐक रजत,मला कळत रे.सगळया group ने डोक भण भणून ठेवलय माझा.
तो:हं..
ती:तू  ,मी ,एकमेकांना सगळं सांगतो.काहीही असला ,लहान मोठा, सगळंच.. आणि मला विश्वास आहे.काही असला तर तू सांगशील मला..
तो:काही असला तरी, काय करणार आहेस तू..
ती:म्हणजे??
तो:काही नाही,चल तुला घरी सोडतो,उशीर झाला आहे.
ती:अरे,कसला उशीर ..5 वाजलेत. आणि विसरलास आपण books घ्यायला जाणार होतो.
तो:मी विसरलो नाहीये,श्रेया..तू..चल उठ आता.
आणि सोबत चालत असूनही त्यांच्या वाटा आता वेगळ्या झाल्या.
पुढे, काय करणार आहे रजत..only the time will tell...

Monday, 18 April 2016

हरवले ते...

कधी काही वस्तु नाही मिळाली कि तार स्वरात आईच्या नावाने सगळं घर डोक्यावर घेणे ,हा प्रकार जगात सर्वत्र चालतो .आता कालचीच गोष्ट, सुपर मार्केट मध्ये गेले,यादी नुसार सगळं सामान घेऊन,बिलिंग कॉउंटरवर पोहोचलो, तर लक्ष्यात आला कि,क्रेडिट नोट आणायला विसरले. माझी अन माझ्या अहोंची नजरानजर झाली.बिलिंग झाल्यावर घरी आलो.
आणि अचानक "तुला एक गोष्ट नीट ठेवता येत नाही,कित्ती वेळा सांगितलं ,सगळे महत्वाचे कागद एका ठिकाणी ठेवत जा"इथे मी अचानक झालेल्या ह्या शाब्दिक चकमकीने स्तब्ध झाले होते.
हातातील कॉफी संपवली, आणि क्रेडिट नोट शोधायला रूम मध्ये गेले. मला माहित होता मी कुठेतरी safe ठिकाणी ठेवली आहे ती नोट.
वॉर्डरोब चा ड्रॉवर उघडला,माझी डायरी अन अजून काही पेपर्स होते तिथे.दुसरा ड्रॉवर उघडणार तोच,माझ्या डायरीमधून ती निळ्या रंगाची क्रेडिट नीट हळूच डोकावली. माझी शोधमोहीम संपली, आणि मोठ्या विजयी तोऱ्यात मी ती अहोंना सुपूर्त केली.
काही ना बोलता ,जेवणाच्या तयारीला लागले,तर परत कानावर शब्द पडू लागले,पण,मधूर स्वरात,"i knew it,you would never misplace a thing,sorry for the words,चल ,बाहेर जाऊ जेवायला.u must be tired,go get ready real quick" आमचे अहो प्रचंड खुश होते.
मी तयार होता होता विचार करत होते,जेव्हा आई सगळ्या गोष्टी हातात आणून द्यायची,कधीतरी आपण प्रेमाने थँक you म्हणालो का...कि ते तिचा कामच आहे,हा आपला समज असायचा, कि अजूनही आहे.
"अगं, चल किती उशीर करणार आहेस",अहोंच्या आवाजाने भानावर आले,आणि आईला फोन करायला उठले.
☺☺


Saturday, 16 April 2016

We the mango people

आम कथा...
उन्हाळा सुरु झाला कि घरी एका पाहुण्याची वाट सकल जन आतुरतेने पाहत असतात.काहीजण पावसाची वाट पाहत असतील पण मी मात्र त्या मोस्ट वॉन्टेड ,the king of fruits च्या बाबत बोलत आहे.'आंबा'. कशाही रुपाने त्याचे सेवन करा,पोट भरला तरी मन काही भरत नाही.अजूनही मला आठवतं, आम्ही सगळी भावंडं काय कल्ला करायचो,आजोबा आंबे घेऊन बाजारातून परतले कि,आमच्या गावच्या घरी आई ,मावशी,आज्जी एकत्र जमून एक से एक पक्वान्न बनवायच्या. कधी  आमरस, आंबा बर्फी, मिल्कशेक, ice क्रीम,आता तर अजून बरेच ऑप्शन्स आहेत ,souffle kai ,custard kai.पण सर्वात जास्त मजा यायची जेव्हा गच्चीत आमचा सगळं कुटुंब जमायचं आणि सगळे सोबतीने आंबे खायचे.टोटल धमाल.वडीलधारी आणि बच्चापार्टी सगळे अगदी तल्लीन होऊन जायचो.
माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध लिखाणात मी नेहमी उन्हाळा आणि उन्हाळयच्या सुट्टयांचं वर्णन करायचे. वर्गशिक्षिका, माझे मित्र मैत्रिणी ,आईला पण कुतूहल वाटायचे, सहसा सर्वात आवडता ऋतू हा पावसाळा नाहीतर हिवाळा,माझी गाडी वेगळ्याच वळणावर, त्याला कारणही तसच होता.
दर वर्षी ती उन्हाळ्याची सुट्टी  नवीन आठवणींचा साठा देऊन जायची, त्यावरच तर ,उरलेला वर्ष शहरात आनंदात घालवायचे मी.
तोच एक ऋतू असायचा ,जेव्हा रोजच्या धावपळीच्या जीवनातुन काही दिवस ,एक वेल deserved ब्रेक मिळायचा माझ्या आई बाबांना..आजी आजोबा मावशी,चुलत भावंडं एकत्र जमायचो. गावभ्रमंती करायची संधी मिळायची.
आणि सुट्टी संपली कि ,त्या गोड आठवणींची चव परत जाण्याची ओढ लावून जायची.
तर मग मंडळी आम्र महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..

Friday, 15 April 2016

लगीनघाई😇

नमस्कार मंडळी,
Wedding da season है ...o soniyo dance da reason है...majhya जवळच्या मैत्रिणीचं लग्नं आहे येत्या रविवारी.एकदम आठवण आली स्वतःच्या लग्नाची.
कसले खूश असतो आपण..घरी उत्साहाचं वातावरण. एक एक करुन यादी बनवणं चालू होता. लग्नाचा बस्ता हा आम्हां womaniyancha जिव्हाळ्याचा विषय."तुम्हा बायकांना ना कारणच हवा असता,साड्या विकत घ्यायचा"इति आमचे बंधू. या बाबतीत आमचे बाबा एकदम chilled out,त्यांचे म्हणणं इतकच कि वेळेत आवरा सगळं, मी मात्र मला वाट्टेल तेवढा वेळ घेतेच आणी आमची आई अगदी शांतपणे सगळं ऐकते.देवाने आई हे सॉफ्टवेअर बनविताना  किती research केला असेल...सगळ्या म्हणजे अगदी सगळ्या situations
काय कमालीच्या maturity ने हाताळते.हॅट्स ऑफ!!तर मग लग्नाच्या venue पासून रूखवत,जेवणाचा मेनू, पाहुणचार,गेस्ट लिस्ट आणि अजुन अगणित आणि विशाल व महाकाय अशी लगीनघाई चालू होते.
 सर्वप्रथम वधुची तयारी, त्याला सर्वात जास्त महत्व असता,dont underestimate the anger of a would be bride,she can and will turn into a bridezilla if you upset her.नऊवारी ते लेहेंगा पर्यंत सगळे विकल्प पारखल्या शिवाय गाडी पुढे जात नाही.आणि त्यात सब्यासाची,मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे, विक्रम फडणीस ह्यांनी selection of your dream wedding trossueची निवड करणे हे mutual फंड इन्व्हेस्टमेंटस आर subejct to market risks,please read the offer document carefully before investing ची ऍड एका attempt madhe समजण्या इतके कठीण करून ठेवले आहे.मग दागिने:तोडे,पाटल्या, बांगड्या, कंठी, ठुशी,तन्मणि, राणीहार, कोल्हापुरी साज,न संपणारी यादी आहे.आपल्या आवडीनुसार दागिन्यांची खरेदी होते, आजकाल सोने, चांदी, प्लॅटिनम असे ऑप्शन असल्यामुळे नटून थाटून ते मिरवण्याची मजा अजून और.मेहेंदीच्या designs,हळदीची साडी,संगीत attire, चुडा भरतानाची साडी,थोडक्यात काय तर किमान 25 -30 साडया फक्त वधूसाठी आणि सगळ्या वेगवेगळ्या नक्षी काम असलेल्या, पैठणी,नारायण पेठ ते इरकल, कांजीवरम.नयनरम्य दृश्य असतं ते बुट्टी,काठां पदराची, पदरावरच्या मोराची,जरी कामाचं,इतके सगळे ऑप्शनस असताना साड्या विकत घेतांना आईसोबतचा ते विचार मंथन. आणि मग रोज रात्री जेवण आटपुन केलेली खरेदी न्याहाळत बसणे हा जीवनाचा अविभाज्य भाग होतो.

विवाहाची तारीख,लग्नाचा मुहूर्त,देण्याघेण्याची व मान पानाची लिस्ट,उभय पक्षी मान पानाचे ठरते.

मग पेट पूजा ,जेवणाचा मेनू,अस्सल मराठमोळा,Indian ,कॉन्टिननेटल,punajbi ,थाई cusiuin,या पैकी होतील तितके permutations आणी combination करून शेवटी मेनू ठरतो.
दोन्ही पक्षाचे पाहुणे आणि पानांची यादी तयार होते.
पूजेचे साहित्य, त्यात धार्मिक कि वैदिक हाही एक संकल्प आणि गुरुजींची शोधमोहीम कार्य सिद्धीस नेण्यासाठी.रेसेप्शन ची जागा ,मग हॉल हवा कि ओपन lawn. यश चोप्रा style शादी ,😎डेस्टीनशन wedding, थिम wedding खूप ऑप्शन्स आहेत आजकाल.
लग्नपत्रिका desing selectionआणि हो pre wedding photoshoot, wedding video, candid photgraphy .
जरी काळानुपरत्वे बदल झाला आहे ,आपल्या लग्ना पद्धतीत पण ती excitment,लुद्यबुड, मजा, मस्ती, मस्करी कायम आहे,आणि नेहेमीच राहील. दुरून आपल्या लेकीची लगबग पाहून 'होणार सून तू त्याघराची हे 'गाणं मनात आठवून डोळ्यांतील आपली आसव हळूच लपविणारे वधूचे आई वडील परत कामात स्वतःला गुंतवून घेतात.

मित्रा मैत्रीणी, शेजारी,नातेवाईक केळवणाची बोलावणी पाठवू लागतात. बॅचलर आणि bachelorette parties चालू होतात. आज्जी तोरणापासून हळदी कुंकू आणि विड्याच्या पानांची ते उपरणे ,शाल,टोपी, सोवळं, आणि गुरुजींच्या दक्षिणेची to do listआईकडे सुपूर्त करते.
घरातील प्रत्येक जण जणू एका प्रभावाखाली वावरत असतो घरातल्या लग्न कार्यासाठी.
आणि हळू हळू वधूला जाणीव होत असते एका नवीन प्रवासाची..लगीन घटका समीप आली,करा हो लगीनघाई....
शुभा मंगल सावधान😉😊💃💑💖!!!!!!

Thursday, 14 April 2016

Early to bed ,early to rise makes a man healthy,wealthy and wise..lahanpana pasun aapan sagle aikat ahot,kadachit bhasha vegli asel pan artha ekach. Mala nahi jamle aJun,aadhi shala mag college mag office velapatrak milalya shivay zopecha ganit sutat nahi.Aai la shanka ahe ki mi  kumbhkaranachya khandantil ahe,malahi tasech vatate.
Tar goshta ashi ahe ki,suruvat, prarambh, apan sagle plan karat asto.shalecha pahila divas,ti navin pustaka, aaichya mage lagun vikat ghetlela daptar,chitrakalecha sahitya.kai excitement  asaychi.mala tar prachand avdaycha chitrakalecha taas.Halu halu pahile te dahavicha apla shalecha pravas sampto.
  Mag collegechi swapna padu lagtat,aai ne sangitleli bag ata out of fashion vatu lagte.
Halu halu collegeche divas mage padtat mag sagle dhavtat corporate madhe.
Tithehi tech 1st day at work,1st boss,1st assignment, 1st project.mi khup khush hote tya pahily weekend baddal,karan kai tar ushiraparyanta zopayla milel.majha zopevar jara jasta prem ahe,evhana tumchya lakshat ala asel mhana.
Job suru jhalyavar ajun eke mahatvachi tarikh aste ti pahilya pagarachi. To Aai Babanna direct dyaycha ki gifts anaychi, ki mag saral devagharat thevaycha ashi kahitari planning chalu aste aplya manat.
Lahanpasapsun te lagnaparyanta apan barach kahi karto, shikto,asankhya badal observ kar to, swatahmadhe ani baryach itar goshtinmadhe,pan ek na badalnari goshta aste tI mhanje Palak,aple Aai Baba, tyancha aplyavarcha prem,vishwas,apulaki sagla agdi pahilyasarkha,abadheet.
Aajcha ,ha majha pahila prayatna likhanacha, asha karate vachakgananna tyanchya pahilya suruvatichi athavat karun deun, satat pudhe janyasathi prerit karanyasathi.

Anamika


P.S. Marathi likhanacha 1st attempt so chuka jhalya aslyay mafi asavi..sudharna in progress